उद्यापासून मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सीचा शुभारंभ

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२२ : जलप्रवासाचा आनंद लुटणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. उद्या १ नोव्हेंबर पासून, मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सीचा शुभारंभ होत आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग ची सुरुवात सुद्धा करण्यात आलीय. वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबई ते मांडवा हा जलप्रवास अवघ्या ४५ मिनिटात पूर्ण होणार. याची सुरुवात मुंबई क्रूज टर्मिनल ते मांडवा या वॉटर टॅक्सीने होतेय. वॉटर टॅक्सीच्या प्रवासासाठी प्रवाशांना चारशे रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत.

वॉटर टॅक्सी प्रवाशांची सोय लक्षात घेता ही मोटार टॅक्सी बनवलीय. या टॅक्सीतून एकाचवेळी जवळपास २०० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. त्याचबरोबर या टॅक्सी मध्ये एसीचीही सुविधा लावण्यात आलीय. सुरुवातीच्या काळात ही टॅक्सी सेवा मुंबई क्रूज टर्मिनल वरून सकाळी १०:३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादानुसार या वेळेत बदल होऊ शकतो. पुढे गेटवे ऑफ इंडिया पासून ही सेवा सुरू झाल्यावर सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहील.

प्रवासासाठी जलमार्गाने प्रवाशांना दुसरा मार्ग मिळावा, म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये ही सेवा सुरू केली होती. परंतु क्रूज टर्मिनस प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यानं वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबई मधून सेवा सुरू करण्यास नकार दिला. आता मुंबई क्रूस टर्मिनस वरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सुमारे सहा महिन्यानंतर नयनतारा शिपिंग कंपनीनं मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा