देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिणामी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.
व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
व्याज दर : नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.