बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत केंद्रीय दलाच्या तैनातीवरून राज्यसरकारची न्यायालयीन लढाई

कोलकाता १९ जून २०२३: पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, कलकत्ता उच्च न्यायालयात केंद्रीय दलाच्या तैनातीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगाल सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला, खंडपीठाने याचिका स्वीकारली असून केंद्रीय दलाच्या तैनातीच्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील केले, परंतु या प्रकरणी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी यापूर्वीच कॅव्हेट दाखल केले होते. वरिष्ठ अधिवक्ता मीनाक्षी अरोरा यांनी सांगितले की, कलकत्ता उच्च न्यायालयाने ४८ तासांत केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिलेले, यानंतर न्यायालयाने आणखी वेळ द्यावा, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि अबू हसिम खान चौधरी यांनी सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाविरुद्ध अवमानाची याचिका दाखल केली. आयोगाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा