सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी राज्य सरकारचा सीबीआय चौकशीस विरोध

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२०: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही शनिवारी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. सीबीआयच्या तपासाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने सीलबंद लिफाफ्यात तपासाचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारने बिहारवर बरेच आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, बिहार सरकारने या प्रकरणात नियमांविरूद्ध कार्य केले आहे. बिहार सरकारला फक्त झीरो एफआयआर नोंदविण्याचा अधिकार होता. त्यांनी एफआयआर दाखल करुन आम्हाला पाठवायला हवा होता.

राज्य सरकारने आपल्या या उत्तरात असे म्हटले आहे की, ‘बिहार ने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे तसेच एफ आय आर देखील नोंदवला आहे. परंतु, एफ आय आर नोंदवण्याचा बिहार सरकारला कोणताही हक्क नव्हता. अर्थातच त्यांनी केलेली ही तपासणी देखील बेकायदेशीर आहे. जिथे याप्रकरणाची तपासणीचा बेकायदेशीर आहे तर बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कशी काय करू शकते? आणि महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने देखील सीबीआय चौकशीची शिफारस मान्य केली आहे ती देखील एक चूक आहे.’

महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे की, सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करणे योग्य नाही. केंद्र सरकारची बिहारची अनधिकृत शिफारस मान्य करणे हे केंद्र-राज्य संबंधांच्या घटनात्मक निर्णयाच्या विरोधात आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस राज्य सरकार सुरुवातीपासूनच करत आले आहे. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या की, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजकारण करीत आहेत. त्यांची शिफारस घटनात्मक कायद्यांसाठी किंवा सुशांतला न्यायासाठी नाही. कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, सीबीआय चौकशीचा निर्णय महाराष्ट्र सरकारच घेऊ शकेल.”

दुसरीकडे सुशांतसिंग यांचे वडील के के सिंह यांनीही रिया चक्रवर्ती यांच्या बदली याचिकेला उत्तर म्हणून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यात के के सिंह म्हणाले आहेत की, रियाने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीवर दबाव आणला. त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे की रियाच्या याचिकेत काही योग्यता नाही. म्हणून ते नाकारले पाहिजे. सुशांतच्या वडिलांनी रियावर आरोप केला की तिने साक्षीदारांवर प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आहे. रिया चक्रवर्ती हीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि बिहार पोलिसांना सुशांतचा खटला मुंबईत वर्ग करावा अशी विनंती केली होती, त्यास उत्तर म्हणून केके सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा