नसरापूर, १३ ऑक्टोबर २०२२: राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे हे बेपत्ता झाले असून त्यांनी सारोळा येथील निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध सूरु असून घटनास्थळी वरीष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. शशिकांत घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ येथे दीसून आले आहेत. या प्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी पहाटे घोरपडेच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
शिरवळ येथील निरानदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पुलाकडे जात असताना सीसीटीव्ही फुटेज दिसून आले आहे. यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीने नदी पात्रात उडी मारली आहे. याबाबत काही स्पष्टता होत नाही.
या ठिकाणी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, महाबळेश्र्वर ट्रेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे भोईराज जल अपत्ती असे बरेच अधिकारी शोधकार्य करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर