आगवणे दाम्पत्याला राज्यस्तरीय आदर्श माता -पिता पुरस्कार जाहीर

13
बारामती ९ फेब्रुवरी २०२१ : सुसंगत फौंडेशन पुणे यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्कार बारामती येथील आगवणे दांपत्याला देण्यात आला.कौटुंबिक परीस्थिती नाजूक असताना मोलमजुरी करून आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्याचा मनी ध्यास घेतला होता.सुसंगत फौंडेशन पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण २७ आदर्श माता-पित्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा देऊन घडवलेल्या बारामतीच्या आशा गोविंद आगवणे,कै.गोविंद गणपत आगवणे यांना सुसंगत फौंडेशन पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श माता-पिता म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आगवणे दांपत्याने आपल्या दोन्ही मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून उच्च शिक्षण दिले. गोविंद आगवणे यांच्या निधनानंतर आशा आगवणे यांनी मुलींना उच्च शिक्षित केले.मोठी मुलगी अनिशा माने या बँकेत शाखा व्यवस्थापक आहेत.तर दुसरी मुलगी सीमा अमित दुर्गे या देखील चांगल्या नोकरीला आहे.तर मुलगा प्रसाद हा पदवीचे शिक्षण घेत आहे.याची दखल घेऊन सुसंगत फौंडेशन यांनी आगवणे यांना आदर्श माता- पिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख,संस्थेचे अध्यक्ष डॉ.सु.भ.न्हाळदे, सचिव डॉ.संगीता न्हाळदे,उद्योजक मल्हारराव इंगळे, वैशाली वाघमोडे, डॉ.सुनील धनगर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव