गोल पोस्ट इतर राजकारण नागालँड मधील प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी अजित पवारांच्या पाठीशी, शरद पवार यांना...

नागालँड मधील प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी अजित पवारांच्या पाठीशी, शरद पवार यांना राष्ट्रीय स्तरावरही धक्का

नवी दिल्ली, २१ जुलै २०२३ महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद आता इतर राज्यातही पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची नागालँड मधील पूर्ण पक्ष संघटना शरद पवार यांच्या ऐवजी अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी याची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँड प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडिओ यांनी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन नागालँडची पक्ष संघटना अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण प्रदेश कार्यकारणी, सात आमदार आणि जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष ओडिओ यांनी पटेल आणि तटकरे यांना दिली. या सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्रेही कार्याध्यक्ष पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version