घरपट्टी माफ करण्यासंदर्भात मनसेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बारामती, दि.४ मे २०२० : कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनच्या काळातील बंदमध्ये बारामती नगर परिषद गाळाधारकांची संख्या मोठी आहे. पालिकेच्या मालकीचे शहराच्या मुख्य ठिकाणी व्यापारी संकुल आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात तीन महिने व्यवसाय बंद असल्याने पालिका आकारात असलेले दुकानाचे भाडे व घरपट्टी तसेच खासगी बिगर-निवासी मालमत्ताधारकांना या काळात घरपट्टी माफ करण्यात यावी, यासाठी ऑनलाईन सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे .अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यावर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी दुकाने, आस्थापना,कार्यालय बंद आहेत. बारामती नगरपरिषदेने देशात लॉकडाऊन होण्याच्या आधीच खबरदारीचा उपाय म्हणून बारामतीतील व्यवहार बंद केले होते. या टाळेबंदीच्या काळात व्यवसाय बंद असल्याने बहुतांश लोकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. येणाऱ्या काळात देखील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावं लागणार आहे. अशा बिकट परिस्थितीत नगरपरिषदेने त्यांच्या विविध व्यावसायिक संकुलातील गाळेधारकांना तसेच इतर खासगी गाळेधारक यांचे या काळातील भाडे, घरपट्टी किंवा इतर कर आकारणी करणे संयुक्तिक राहणार नाही.

साधारण मार्च २०२० ते टाळेबंदी पूर्णतः उठेपर्यंतच्या काळातील हे सर्व कर, भाडे माफ करण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी यांच्या कडे करत आहोत. तसेच (दि.१) मे पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनतेला ऑनलाईन पाठिंबा मिळवण्याची मोहिम सुरु केलेली आहे. त्यावर आम्हाला संबंधित गाळेधारकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा पद्धतीने बारामतीमध्ये ऑनलाइन मत नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे सोशल डिस्टन्सचे पालन होते आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आर्थिक वर्ष २०१९-२०२० ची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरण्यास नागरिकांना अडचण निर्माण झाल्याने अनेकांना वेळेत कर ३१ मार्च पर्यंत भरता आला नाही. याचा विचार करून या नागरिकांकडून कर मुदतीत न भरल्याने कोणताही दंड अथवा शास्ती आकारू नये. तरी आपण याचा गांभीर्याने विचार करून नगरपरिषदेच्या गाळेधारकांचे भाडे व घरपट्टी तसेच इतर खासगी बिगरनिवासी मालमत्ताधारकांची या काळासाठीची घरपट्टी माफ करण्यात यावी.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

या विषयात जनतेसोबत आहे.

सुधीर शरद पाटसकर -महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मनसे , पोपटराव सूर्यवंशी पुणे जिल्हा उपाध्यक्ष , निलेश वाबळे तालुकाध्यक्ष स्वप्नील मोरे शहर
फोटोओळी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड सुधीर पाटसकर यांनी मागणी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा