सोलापूर जिल्ह्यात मठाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन खासदार डॉ जयसिध्देश्वर स्वामींना निवेदन

सोलापूर, २१ सप्टेंबर २०२० : राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर आज मराठा समाजातर्फे सोलापुरात आंदोलन केले जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर आज मराठा समाजातर्फे सोलापुरात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. माढ्यात काही ठिकाणी टायर जाळत जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाकडून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे.

तत्पुर्वी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर आंदोलन करत मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले. भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर सकल मराठा समाजाने आंदोलन केलं. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी दिल्लीत असल्याने त्यांच्या मठाचे सचिव जयशंकर शेट्टी यांनी सकल मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले. यानंतर मठाबाहेरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. केंद्रातून लवकरात लवकर आरक्षणाचा वटहुकूम काढला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करु असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिलाय.

तर पंढरपुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. माळशिरस-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे २ हजार पोलीस तैनात केले आहेत.

दरम्यान काल (२० सप्टेंबर) मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेत मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुंबईतील जवळपास १८ ठिकाणी हे आंदोलन केले गेले. मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चाने निषेध नोंदवला. मुंबई लगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे

तर २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे.

मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग
मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. मराठा आरक्षणाअंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा