बारामती ९ फेब्रुवरी २०२१ : सम्यक विद्यार्थी आंदोलन बारामती च्या वतीने तालुक्यातील बंद असलेल्या सर्वच गावांतील बस सेवा सुरू करण्यासाठी आणि आय टी आय मधील परीक्षा व निकाल लागेपर्यंत शिकाऊ प्रशिक्षणार्थी भरती थांबवण्या बाबत तहसिलदार व बारामती आगर व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन मध्ये एसटी बस सेवा बंद करण्यात होती.मात्र एसटी सुरू झाल्यावर देखील अनेक गावांत एसटी जात नाही त्यामुळे शाळा, महाविद्यालय,नोकरीला जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे.तर खाजगी वाहन चालकांकडून अडवणुक करुन ज्यादा पैसे घेत आहेत.ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी व एसटी सेवा पुर्ववत करावी यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले आहे.तसेच २३ मार्च २०२० पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी बसचा पास काढलेला होता.मात्र लोकडाऊन सूर झाल्याने विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी किंवा पासची मुदत वाढविण्यात यावी.असे निवेदनात म्हटले आहे.
सन २०१८ ते २०२० कालावधीत आय.टी.आय.मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कोरोना मुळे शासनाने परीक्षा घेतली नाही.त्यामुळे विद्यार्थी आभ्यासक्रम वेळेत पुर्ण करू शकले नाहीत.तरी शासनाने यावर्षी प्रशिक्षणार्थी भरतीस सुरवात केली आहे.तरी या विद्यार्थ्यांचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही प्रकारची भरती घेण्यात येऊ नये अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.दोन्ही निवेदनात नमुद केलेल्या मागण्यांची योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सरकारी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.यावेळी ब्लुर पँथरचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे,रोहित भोसले,विनय दामोदरे,विक्रांत उजगरे,सोहम चव्हाण,निलेश सोनवणे,अविनाश सूर्यवंशी, जीवन महाजन तसेच सम्यक आंदोलनाचे सर्व
पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव