भोकरदन तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींना डीपीडीसी अंतर्गत ८० लाखांचा निधी

भोकरदन, जालना १६ एप्रिल २०२४ : भोकरदन तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींना मतदान केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (डीपीसी) जिल्हा नियोजन मंडळातून ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक झाली. यावेळी मतदान केंद्रांच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात लागणाऱ्या खर्चाचा तपशील घेण्यात आला. यात वर्गखोली दुरुस्ती, दिव्यांगांसाठी रॅम्प, शौचालय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची टाकी, स्वच्छ पिण्याचे पाणी व वेब कास्टिंगबाबत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मतदान केंद्रावर कॅमेरा लावण्यासाठी बोर्डची व्यवस्था आदी विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

भोकरदन तालुक्यातील आन्वा, विझोरा, बामखेडा, बेलोरा, बोरगाव बोरगाव तारू, जवखेडा ठोंबरे, केदारखेडा, मेरखेडा, टाकळी हिवरडी, वालसा खालसा, गव्हाण संगमेश्वर, निंबोळा, बाभुळगाव, सिपोरा बाजार, पारध वु, वरुड, सावंगी अवघडराव, पिंप्री, सोयगाव देवी, वालसा डावरगाव, नळणी खुर्द, डावरगाव, समर्थनगर, नळणी बु, दगडवाडी, दानापूर, कोदा, हिसोडा बु,धोंडखेडा, कोठा कोळी, करजगाव या ग्रामपंचायतींसाठी निधी मंजूर करण्यात आला.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी नागरीकांत जनजागृतीच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (डीपीसी) जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर निधीतून वर्गखोली दुरुस्ती,दिव्यांगांच्या रॅम्प दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती,पिण्याच्या पाण्याची टाकी व व्यवस्थेसाठी एकूण ८० लाखां चा निधी मंजूर करण्यात आला आहे.अशी माहिती विष्णु बोडखे गटविकास अधिकारी यांनी न्यूज अनकट टीव्हीला प्रतिक्रिया दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा