दुधाला रास्त भाव मिळण्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन.

पुणे, दि.२८ जुलै २०२० : लॉकडाऊनच्या काळात दूध खरेदीचे दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत , त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे . अशा परिस्थितीमध्ये शासनाने अतिरिक्त दूध खरेदी बंद केली आहे. त्यामुळे आज प्रचंड गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे .

याची दखल घेत, दूध दरवाढी संदर्भात युवा क्रांती दलाने आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिले. महाराष्ट्रातील साधारण १५ जिल्ह्यामध्ये निवेदन देण्यात आले . दुधाच्या दरामध्ये योग्य ती वाढ करण्यात यावी ह्या मागणी सोबत उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे निर्णय घेण्यात यावेत. या मागण्यांना घेऊन जिल्ह्याअधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी खालील मागण्या युक्रांद कडून करण्यात आल्या :

• शेतकऱ्यांचा दूधाला किमान ३५ रु. प्रति लिटर खरेदी दर मिळवा.

• केंद्र सरकारने जो बाहेरच्या देशातून दूध पावडर मागवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो तातडीने मागे घ्यावा.

• तसेच राज्य सरकारने १०लाख लिटर ऐवजी ४० लाख लिटरने खरेदी करावी.

• दुधाचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा करावे.

यावेळी युक्रांदचे पूर्णवेळ कार्यकर्ते रवी लाटे, पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे आणि कार्यवाह सुदर्शन चखाले उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा