असे रहा तणावमुक्त…

पुणे, २३ फेब्रुवरी २०२१: हल्ली आपले आयुष्य खूप धावपळीचे झाले आहे. तणावाचे ही आहे त्यामुळे आज आम्ही आपण कसे आनंदी आणि तणावमुक्त राहयचे  त्या बद्दल सांगणार आहोत. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच आनंदी रहाल. तर आज आपण स्वतःला कसे खुश ठेवायचे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

समाधानी व्हा….                                                                                                                    अनेक वेळा माणसावर कठीण काळ येतो तेव्हा तो त्यांच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी कडे दुर्लक्ष करत नकारात्मक गोष्टी कडे ओढला जातो.त्यामुळे आपल्या कडे काय नाही,यापेक्षा काय आहे यासाठी समाधानी व्हा.

सामर्थ्याचे कौतुक करा….
नेहमी आपल्यात आसणार्या सामर्थ्याची प्रशंसा करण्याची सवय लावून घ्या. स्वतासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. आपल्यातील उणिवांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील ताकद आणि विजायचे कौतुक करा.

आपल्या उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यायाम करा….
व्यायाम हा एक विश्वासार्ह मूड-बूस्टरपैकी एक आहे. फक्त दहा मिनिटं चाललात तरी तुमचा दृष्टीकोन बदलू शकतो. फक्त आपल्याला आनंद घेता येईल अशी गोष्ट निवडणे आवश्यक आहे.

आपल्यातील कलागुणांना वाव द्या….
आपल्या पसंतीच्या कला किंवा हस्तकलांच्या कार्यात व्यस्त व्हा. यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तणाव कमी झाला की आपोआप तुमचा मुड आनंदी होईल.

दिनचर्या बदला….
आयुष्यात कधी ना कधी आपली दिनचर्या ठरलेली असते. शक्य असल्यास आपली सततची दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ताण तोडण्यास मदत होते.

पुरेशी झोप घ्या….
जर तुम्हाला तणाव आसल्यासारखे वाटत आसेल तर कमीत कमी ७ ते ९ तासांची झोप घ्या. पुरेशी झोप न घेतल्याने आरोग्याच्या समस्या उद्धवू शकतात. शिवाय मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

स्वयंसेवा करण्यास शिका……
कोणत्याही संस्थेत सामील व्हा आणि मोठ्या कारणासाठी मदत करा. स्वयंसेवा स्थानिक समुदाय तयार करण्यास मदत करते आणि आपल्याला एक आनंदी व्यक्ती बनवू शकते. जेष्ठ समुदायाची सेवा करा. बेघर अनाथांमधे शिक्षणासाठी जागरूकता निर्माण करा.

आयुष्यात हे बदल जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त करेल. त्यामुळे एकदा तरी हा बदल आपल्या आयुष्यात करून बघा आणि स्वताला खुश ठेवा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा