नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२२ : टेक क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या अॅपलचे चेअरमन, सीईओ आणि सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या ४२ वर्षांपूर्वीच्या सँडल जोडीचा लिलाव होत आहे. स्टीव्ह जॉब्स ‘ब्राऊन सुड लेदर बर्केनस्टॉक अॅरिझोना सँडल्स’ वापरत होते, जी आता लिलाव करणारी कंपनी ‘ज्युलियन ऑक्शन्स’ च्या अधिकृत वेबसाईडवर लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.
स्टीव्ह जॉब्स यांच्या ४२ वर्षांपूर्वीच्या सँडलचा लिलाव ६४ लाखांपेक्षा जास्त किंमत लिलावात मिळण्याची अपेक्षा आहे. सँडलला ६४.४३ लाखांपर्यंत किंमत मिळू शकते.
ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळानुसार, स्टीव्ह जॉब्सच्या सँडलचा ६० हजार ते ८० हजार डॉलर्स म्हणजेच ४८.३२ ते ६४.४३ लाख रुपयांना लिलाव होऊ शकतो. ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळावर सॅंडलचे फोटोही शेअर करण्यात आलेले आहेत. या फोटोंमध्ये स्टीव्ह जॉब्सचे ब्राउन सँडल खूप जुने दिसत आहेत.
११ नोव्हेंबर ला या सँडलचा लिलावाला सुरूवात झाली असून या लिलावाची प्रक्रिया आज १३ नोव्हेंबरला संपणार आहे. मिळालेल्या ज्युलियनच्या वेबसाइटवरील माहितीनुसार सँडलची बोली १५,००० डॉलर (रु. १२.८ लाख) पासून सुरू झाली. यानंतर, सध्या २२,५०० डॉलर्स १८.१२ लाख रुपये साठी दोन बोली लावण्यात आल्या आहेत. आता स्टीव्ह जॉब्सच्या सँडलची बोली किती पुढे जाणार हे लिलाव संपल्यावर कळणार आहे.
सत्तरच्या दशकात वापरत होते ही सॅंडल
ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, स्टीव्ह जॉब्स १९७० ते १९८० च्या दशकात या सँडलची जोडी वापरत होते, यानंतर बर्कनस्टॉक सँडलची ही जोडी स्टीव्ह जॉब्स यांचे गृह व्यवस्थापक मार्क शॅफ यांना दिली.
तसेच एका मुलाखतीत स्टीव्ह जॉब्सची पत्नी क्रिसन ब्रेनन यांनी जॉब्सच्या कपड्याच्या, राहण्याच्य शैलीबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या की, ‘सँडल स्टीव्ह यांच्या साधेपणाचे लक्षण होते. ही त्याच्या साधेपणाची एक बाजू होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे