भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती..

51
Steve Smith Retires ODI Cricket Steve Smith
भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Steven Smith Retires from ODI Cricket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई येथे खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनल सामन्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय संघाकडून ४ किकेट्सने दारुण पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने काल दुबईमध्ये निवृत्तीची घोषणा केली. जरी स्मिथने एकदिवसीय क्रिकेकमधून निवृत्ती घेतली असली तरी कसोटी आणि टी- २० क्रिकेट खेळणार असल्याच स्मिथने सांगितले आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा नियायमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने स्टीव्ह स्मिथवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.स्मिथच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे तो २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग नसेल हेही स्पष्ट झाले आहे.

Steve Smith Retires From ODI Cricket

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर स्टीव्ह स्मिथने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, मी एकदिवसीय क्रिकेटचा पुरेपूर आनंद लुटला आहे. या वाटचालीत अनेक समाधान आणि आनंद देणाऱ्या आठवणी आहेत. दोनदा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद क्षण आहे. संघ म्हणून प्रत्येक क्षण जगलो आहे. २०२७ विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला कारण नवीन खेळाडूना संधी मिळेल. कसोटी क्रिकेट हे माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. असं स्मिथने सांगितलं.

स्मिथने ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना १७० एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४३.२८च्या सरासरीने ५८०० धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने १२ शतक आणि ३५ अर्धशतक झळकावले आहे. स्मिथच्या नावावर एकडीवसीय क्रिकेटमध्ये विकेट्स सुद्धा आहेत. त्याने आपल्या एकडीवसीय क्रिकेटमध्ये २८ विकेट्स घेतल्या आहेत. काल झालेल्या सेमीफाईनलच्या सामन्यात स्मिथ चांगल्या लयात होता. तो शतकी खेळी करेल असे सुद्धा वाटत होते. पण मोहम्मद शमीने त्याला ७३ धावांवर असताना बाद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर