कारभारी अण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बारामती : के.ए.सी.एफ. इंक्लिश मिडीयम स्कुलमध्ये ७१वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
२६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण भारतात अंमलात
आले व आपण सर्व भारतीयांनी भारताचा तिरंगा फडकावुन त्याचा स्वीकार केला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आदर भावना स्वतंत्र भारताची तसेच भारतीय नागरीक म्हणून आपले हक्क व कर्तव्ये यांची जाणीव करून देणेकरिता आपण काहीतरी देणे लागत असून त्यांना वेळोवेळी मान सन्मान मिळावा.
या स्वच्छ हेतुनेच आमच्या शाळेच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक धीरज पांडूरंग दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच राष्ट्रगीत व संचालनातुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
विद्यार्थ्यामधील क्षमता ओळखून व उत्तम आरोग्याचे वटदान लाभावे या हेतुने योगासनांवर आधारीत पिरॅमिड, लोककलेचे व भारतीय संस्कृतिचे दर्शन घडविणारे लेझीम अशा विविध कार्यक्रमातून सहभागी होत राष्ट्रीय एकात्मता, समता, बंधूता, देशभक्ती इ. अनेक मुल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रूजविण्याकरिता प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमास माजी सैनिक धीरज पांडूरंग दळवी
प्रशांत सातव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व शिस्तबध्द पध्दतीने सादरीकरण होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता व्यास व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा