पुणे, दि. ३० जून २०२०: काल रात्री सरकारने चिनी बनावटीचे हे सर्व ॲप्स ज्यामध्ये ५९ ॲप्स आहेत ते सर्व प्रतिबंधित केले आहेत. इतर ॲपच्या तुलनेत टिक टॉक ची तुलना केली तर भारतामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे ॲप हे टिक टॉक ॲप बनले होते. परंतु सरकारने आता त्यावर निर्बंध लादले आहेत आज सकाळपर्यंत टिक टॉक प्लेस्टोर वरून काढून देखील करण्यात आले आहे.
एप्पल ने सुद्धा टिक टोक ला काढून टाकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ज्याप्रमाणे प्लेस्टोअर अँड्रॉइडसाठी आहे त्याच प्रमाणे आय ओ एस साठी ॲप स्टोअर आहे. ॲप स्टोअर वरून देखील लवकरात लवकर टिक टॉक काढून टाकण्यात येईल. मात्र असे असून देखील ज्यांच्याकडे टिक टॉक आधीपासूनच फोन मध्ये इन्स्टॉल आहे त्यांच्याबाबतीत काय?
सध्या सरकारने ही ५९ चिनी बनावटीचे ॲप प्रतिबंधित केले आहेत. परंतु ज्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप आधीपासूनच आहे ते सध्या याचा वापर करत आहेत. खासकरून टिक टॉक वापर करते हे ॲप वापरण्यासाठी इतके अधीन झाले आहेत की अजून देखील हा मोह त्यांना टाळता येत नसल्याचा दिसत आहे. परंतु येथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो राष्ट्रीय सुरक्षितेचा. राष्ट्रीय सुरक्षितेपेक्षा टिकटॉक वापरण्याचा मोह नक्कीच मोठा नाही.
सध्या टिक टॉक केवळ प्ले स्टोर वरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र नेटवर्क व सर्वर च्या बाबतीत सरकारने अजून ते बंद केलेले नाही त्यावर प्रक्रिया सुरू आहे. या काळात देखील टिक टॉक वापर करते टिक टॉक चा सर्रास वापर करणार आहेत. परंतु हा एक प्रकारे लडाख मध्ये शहीद झालेल्या २० जवानांनाचा अपमानच असेल. केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारी पुरतीच आपली देशभक्ती सीमित न ठेवता ती आपल्या कृतीतून देखील दिसणे अपेक्षित आहे. त्यामुळे नेटवर्क व सरव्हर विषयी पूर्ण प्रक्रिया होई पर्यंत तरी टिक टॉक आतापासूनच बंद करणे देश हितासाठीच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी