शेअर बाजाराने गमावली तेजी, गुंतवणूकदारांनी गमावले ३.३ लाख कोटी

मुंबई, १५ ऑक्टोंबर २०२०: आठवड्याच्या चौथ्या व्यापार दिवशी म्हणजेच गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने गेल्या दहा दिवसात मिळवलेली बढत गमावली. सुरुवातीच्या व्यापारातील तेजीनंतर सेन्सेक्स अखेर १०४६ अंक म्हणजेच २.६१ टक्क्यांनी घसरून ३९,७२८.४१ अंकांवर स्थिरावला. निफ्टीविषयी बोलताना निफ्टीचा निर्देशांक ११,६३०.३५ अंकांवर बंद झाला. निफ्टी २९०.७० अंक म्हणजेच २.२३ टक्क्यांनी घसरला. या घसरणीमुळे बीएसई निर्देशांकात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

घसरणीचे मोठे कारण:

गुरुवारी भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याची अनेक कारणे होती. पहिले सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक चिन्हे. वास्तविक, निवडणुकीपूर्वी मदत पॅकेज न मिळण्याची शक्यता असल्याने अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये दबावाचे वातावरण आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी म्हणाले आहेत की अमेरिकेच्या निवडणुकांपूर्वी मदत पॅकेज शक्य नाही. याशिवाय युरोपमधील लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे बाजारावरही परिणाम झाला आहे.

त्याचबरोबर आयएमएफच्या जगभरातील जीडीपीच्या अंदाजानुसार गुंतवणूकदारांची चिंताही वाढली आहे. यावर्षी भारतासह जागतिक अर्थव्यवस्था सर्वात वाईट टप्प्यात येईल, असे आयएमएफने म्हटले आहे. नवीन आर्थिक वर्षात मात्र सुधारणेची अपेक्षा आहे. शेअर बाजारात घसरण होण्याचे एक कारण म्हणजे विकली एक्सपायरी दिवस. विकली एक्सपायरी म्हणजेच आठवड्याचा हा एक कार्य दिवस असतो गुरुवार ज्या दिवशी गुंतवणूकदार प्रॉफिट बुकिंग करत असतात.

जागतिक बँकेचे विधान:

दरम्यान, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे १९३० च्या दशकात ज्या प्रकारची आर्थिक मंदी भेडसावली होती त्याच प्रकारच्या आर्थिक मंदीच्या काळातून सध्या जगातील विकसनशील देश, गरीब देश जात आहे. जागतिक बँकेच्या विधानामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान:

दिवसाच्या शेवटी बीएसई निर्देशांकातील मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बुधवारी बीएसईच्या सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप १,६०,५६,,६०५.८४ कोटी होती. गुरुवारी ती १,५७,६५,७४२,.८९ कोटी रुपयांवर आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा