माजलगावात बँक आणि हॉटेलवर दगडफेक, पोलीसही जखमी

27

माजलगाव, २ सप्टेंबर २०२३ : शहरात बंदच्या दरम्यान शिवाजी चौक, नवीन बस स्थानकासमोर आंदोलकांनी दगडफेक केली. तर या ठिकाणी असलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या पूर्णवादी बँक व संभाजी चौकातील एका हॉटेलवरही दगडफेक करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेकजण जखमी झाले होते. याचा निषेध म्हणून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. माजलगाव शहरात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी शिवाजी चौक या ठिकाणी थांबलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक केली. त्याचबरोबर नवीन बस स्थानकासमोर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. यात कोणीही जखमी झालेले नाही. त्याचबरोबर आगारात थांबलेल्या बाजार रोडवरुन दगडफेक करून एका बसच्या काचा फोडण्यात आल्या.

येथील पूर्णवादी बँक आपल्या दैनंदिन कामासाठी उघडण्यात आली होती. यावेळी या बँकेवर दगडफेक करण्यात आली. यात बँकेच्या एटीएम व बँकेच्या इमारतीच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर संभाजी चौक या ठिकाणी असलेल्या सुखसागर हॉटेलवर आंदोलकांनी दगडफेक केली. यात हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा