महामानवांची विटंबना थांबवा अन्यथा शिवधर्म फाउंडेशन आंदोलन करणार

बारामती, ९ फेब्रुवरी २०२१: महामानवांच्या नावांची होत असलेली विटंबना थांबवावी अन्यथा शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान संघटनेच्यावतीने आंदोलन करू. श्री छत्रपती संभाजी महाराज व इतर सत्यशोधक महापुरुषांची नावे व चिन्ह वापरास प्रतिबंध कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी शिवधर्म फाऊंडेशनने केली आहे.
बारामती तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आद्य पुरुष आहेत. संभाजी महाराज हे फक्त योद्धेचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार आहेत. अशा प्रेरणादायी कारकीर्दच्या महामानवाचे बिडीस नाव देणे योग्य नाही.
शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान या संघटनेमार्फत राज्यात मोठे आंदोलन उभे करत बीडी वरील महाराजांचे नाव काढण्यास भाग पाडले. अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेड़कर-अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक महामानवांच्या कार्याला उजळा देऊन देशातील अनेक इतिहासकार नव युवा वर्गामध्ये महामानवांच्या इतिहासाने प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात.
महामानवांच्या नावांचा दुरुपयोग करून(बिअर शॉपी, हॉटेल, लॉज,)पान शॉप येथे अवैद्य व्यवसाय होतात. या व्यवसायांना नाव देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, यासह इतर महामानवांचे नाव वापरले जाते. वापरून महामानवांच्या नावांची होत असलेली विटंबना थांबवावी अन्यथा शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवधर्मचे संस्थापक अध्यक्ष दिपक काटे यांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा