मुंबईतील पूर्व, पश्चिम महामार्गांवरील टोलवसुली बंद करा, आदित्य ठाकरे यांची मागणी

12

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम या दोन महामार्गाची देखभाल महापालिकाकडून होते. मग टोलवसुली का केली जात आहे. मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी लावला जात आहे. मुंबईतील हे दोन टोलनाके बंद करा, अशी मागणी ठाकरे गटांचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज केली आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले की, मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्गांवरील टोलचे पैसे एमएसआरडीसीकडे का दिले जात आहेत? सुमारे २ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे टोल बंद होईपर्यंत हा निधी बीएमसीला द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबईतील दोन महामार्ग बीएमसीला दिले आहेत. मग टोलवसुली का केली जात आहे. त्यामुळे हे टोल बंद करा, अशी मागणी करुन आमचे सरकार आल्यानंतर हे टोल बंद केले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर