बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळं वादळाचा धोका, ५ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली, १२ ऑक्टोंबर २०२०: सध्या बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचं क्षेत्र येत्या २४ तासांत तीव्र दाबात बदलू शकतं. वादळात बदल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशाच्या खालच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्रामुळं मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर या राज्यांच्या किनारपट्टी भागात २० सेमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही भीती लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून पुढील आठवड्यापर्यंत देशाच्या उर्वरित भागातून काढता पाय घेण्याची शक्यता नाही, त्यामुळं पावसाळ्यात आणखी वाढ होईल. वस्तुतः, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचं क्षेत्र पुढील २४ तासात खोल दाबामध्ये बदलू शकेल आणि १२ आॅक्टोबर रोजी रात्री आंध्र प्रदेशचा उत्तरी किनारपट्टी नरसपूर ते विशाखापट्टणम दरम्यान ओलांडण्यास सक्षम असंल. सध्या ते पश्चिम आणि वायव्य दिशेनं जात आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा व्यतिरिक्त उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशाच्या अंतर्गत भागांत १३ ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, “सध्याच्या दबावामुळं पुढच्या आठवड्यात नैऋत्य मॉन्सून परत जाण्याची शक्यता फारच कमी आहे.” ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं.

मच्छिमारांना ओडिशामध्ये समुद्राकडं जाण्यास मनाई

पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं बुधवारपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार हवामान खात्यानं पुढील काही दिवस जोरदार पावसासह जोरदार वारे वाहू शकतात असा अंदाज वर्तविला आहे.

‌ अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा परिस्थितीत ओडिशाच्या किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात जाऊ नका असं सांगितलं गेलं आहे. येत्या काही दिवसांत दक्षिण ओडिशामध्ये ४५-५५ कि.मी. जोरदार वारे वाहतील असा विभागाचा अंदाज आहे. देशात पावसाळा १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत असतो. यावर्षी सलग दुसर्‍या वर्षी देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा