पुणे, २५ ऑक्टोबर, २०२२ : पुणे कोर्टाने एक अजबच आदेश काढला होता. त्यात महिला वकिलांनी कोर्टात केस नीट करु नयेत’, अशी नोटीस पुणे जिल्हा कोर्टानं काढली होती. मात्र चौफेर टीकेनंतर कोर्टाकडून आदेश मागे घेण्यात आला आहे. महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. ही क्रिया मन विचलित करणारी कसेच एकाग्रता भंग करत असल्याचं म्हणत महिला वकिलांना असं न करण्याची नोटीस कोर्टानं काढली होती. मात्र आता ती मागे घेण्यात आली आहे.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी नोटीशीवर ट्वीट केलं आहे. “आता बघा! महिला वकिलांकडून कोण आणि का विचलित होत आहे”, असं कॅप्शन देत जयसिंग यांनी कोर्टाच्या नोटीशीचा फोटो जोडला होता. करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, “महिला वकील कोर्टात केस सावरतात, त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. त्यामुळे महिला वकिलांनी कोर्टाचे कामकाज सुरु असताना असं काही करु नये.” यासोबतच नोटीसवर पुणे जिला न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांची स्वाक्षरीही आहे.
एका अहवालानुसार यामध्ये महिला वकिलांना कोर्टात सुनावणीदरम्यान केस सावरु नये किंवा नीट करु नये असं सांगितलं होतं. महिलांनी असं केल्यास न्यायालयाच्या कार्यवाहीत लक्ष विचलित होतं आणि न्यायालयाच्या सुनावणीत अडथळा येतो, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
अनेक टीकेनंतर जरी हा आदेश मागे घेण्यात आला तरीही मात्र महिलांमुळे कोर्टात मन विचलित होणं, या आदेशाला अजिबात अर्थ नसल्याचं महिलांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कोर्टात काय अजब आदेश निघतील, कोणास ठाऊक.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस