वायसीएम रुग्णलायाचा अजब कारभार; महिलेच्या मृतदेहाची केली अदलाबदल

पिंपरी, १९ ऑक्टोबर २०२२: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज दुपारी एक अजब घटना घडली आहे. महिलेच्या मृतदेहाची अदलाबदली झाली, आणि विषेश म्हणजे एका महिलेच्या नातेवाईकांनी मृतावर अंत्यसंस्कार केले आहे.

मिळाल्या माहितीनुसार काल संध्याकाळी दापोडी येथे भिंत पडून एका महिलेचा मृत्यु झाला. या महिलेला वायसीएम रुग्णलायात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आणि त्याच दरम्यान थेरगाव परिसरातील एका मृत महिलेचे देखील शवविच्छेदन करण्यात आले होते.

शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र आज सकाळी थेरगाव येथील नातेवाईकांनी शवविच्छेदनगृहातून मृतदेह नेला. मात्र तो मृतदेह दापोडी येथील महिलेचा होता. त्यामृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंतर आज दुपारी दापोडी येथील महिलेचा मृतदेह घेऊन जाण्यास आले असता, शवविच्छेदनगृहात नातेवाईकांना थेरगाव येथील महिलेचा मृतदेह देण्यात आला. पण संबंधित नातेवाईकांना लक्षात आले की आपली व्यक्ति ही नाही आहे. त्यामुळे मृतदेहाची अदलाबदली झाल्याचे उघडकीस आले.

दापोडी येथील महिलेचा मृतदेह थेरगाव येथे नेण्यात आला आणि अंत्यसंस्कार ही झाला आहे हे समजले त्यानंतर दापोडी येथील महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ केला आणि तोडफोड करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना शांत राहण्याचे आव्हान केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा