तुळजापूर, दि. १९ मे २०२०: तुळजापूर येथे आज मंगळवार दि. १९ मे २०२० रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता मौजे बसवंतवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे हराळे मिसाळ परीवारांचा शिभ विवाह सोहळा सध्या पद्धतीने व अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला.
सध्या जगभर कोनामुळे लॉकडाऊन आहे व श्री.महादेव हराळे यांनी आपल्या मुलाचा विवाह अगदी साध्या पद्धतीने करून समाजासमोर एक आगळा- वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या विवाह सोहळ्याची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली. त्यानंतर वैभव कुलकर्णी यांनी शिवपंचके म्हणून विवाह पार पाडला.
वधुवरांच्या अंगावर अक्षता म्हणून धान्याची उधळन न करता फुलांचा वर्षाव करण्यात आला. सध्या जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने करून सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित योग्य सामाजिक अंतर ठेवून सॅनिटाइजर तसेच मास्कचा वापर करून पल्लवी व संदीप यांना शुभाशीर्वाद देऊन लग्नसोहळा पार पाडण्यात आला. यावेळी गावचे पोलीस पाटील दादा बनसोडे व बसवंतवाडी गावचे सरपंच गणेश उंबरकर, घरातील पाच सदस्य यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा संपन्न करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे