सीमावर्ती भागात मोक्याच्या ठिकाणचे रस्ते,पूल व बोगदे करण्याचे काम वेगवानपणे केले जाईल ; संरक्षणमंत्री

5

नवी दिल्ली, ८ जुलै २०२० : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले की सीमावर्ती भागात मोक्याच्या रस्ते, पूल आणि बोगदे बांधण्याचे काम वेगवान पध्दतीने केले जाईल. श्री. सिंह म्हणाले की, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) या ध्येयासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. काल नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी बीआरओच्या सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेतला.

बैठकीत सीमावर्ती भागांशी संपर्क साधण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला व सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची तसेच सीमावर्ती भागात मोक्याच्या रस्ते, पूल व बोगदा बांधकाम वेगवान करण्याच्या सातत्याने गरजांवर चर्चा करण्यात आली. कोविड -१९ मुळे लागू झालेल्या निर्बंधांच्या काळातही विविध प्रकल्पांच्या प्रगतीवर परिणाम न होवू देता ही बीआरओने अविरत कार्य केले.

अभूतपूर्व हिमवर्षाव असूनही, ६० वर्षाचा रेकॉर्ड मोडत, या वर्षी वाहतुकीसाठी सर्व बायपासेस आणि रस्ते एक महिना आधीच मोकळे करण्यात आले आहेत. बीआरओच्या यशाबद्दल प्रशंसा करताना श्री. सिंह यांनी आणखी मोठे गौरव मिळवण्याचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले. बीआरओने अद्ययावत उपकरणे व मशीन्सही आपल्यात समाविष्ट केली आहेत आणि सिमेंटेशन बेस, प्लॅस्टिक, जिओ टेक्स्टाईलचा वापर आणि उतार स्थिरीकरणाच्या विविध तंत्राचा उपयोग करून वेगवान काम करण्यासाठी वेगवान चाचण्या नंतर आधुनिक बांधकाम पद्धती सुरू केल्या आहेत.

स्वदेशी उत्पादित मॉड्यूलर पुलांसाठीच्या चाचण्या देखील यशस्वीरित्या पार पाडल्या गेल्या आहेत. हे त्या पुढील भागात बनविल्या जाणा-या पुलांसाठी एक सक्षम क्रांती आणेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा