इंदापूर, १२ फेब्रुवरी २०२१: भाजपचे नेते आणि माजी खासदार सोमय्या यांनी इंदापूर दौऱ्यावेळी इंदापूर येथील झालेल्या शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले.यावेळी सोमया म्हणाले की, “सरकार मधील शिवसेनेचे डझनभर नेते यामध्ये अनेक मंत्री आमदार खासदार यांच्या घोटाळ्याची माझ्याकडे पुराव्यासह यादी आहे. तसेच मिका जमीन प्रकरणात ठाकरे कुटुंबीय यांचाही हात असल्याचा माझा दावा आहे.” तसे नसेल तर ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कारवाई करण्याचा आवाहन देखील यावेळी सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केले.
तसेच विकास आघाडी सरकारने कृषी पंपाच्या वीज बिलाबाबत केलेली ही घोषणा फसवी असल्याचे देखील यावेळी म्हणाले. यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांची वीज घेऊन त्वरित थांबविण्याची मागणी केली.
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे भाजपाचे तालुका अध्यक्ष मोठा चेअरमन रघुनाथ राऊत,सागर गणबोटे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे












































