इस्लामाबाद, ३ ऑक्टोंबर २०२२: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पाकिस्तान सरकारच्या मंत्रिमंडळाने ऑडिओ लीक प्रकरणी इम्रान खानविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी समिती स्थापन करण्यात आलीय.
समितीने इम्रान खान यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केलीय. त्याचबरोबर हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याचं कॅबिनेट समितीने म्हटलंय. ज्याचा राष्ट्रीय हितासाठी गंभीर परिणाम होतो. याप्रकरणी कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मंत्रिमंडळाने याला संचलनाद्वारे मंजुरी दिली. तपास यंत्रणेकडं अमेरिकन सायबर आणि ऑडिओ तपासण्याचे काम सोपविण्यात येणार आहे. वास्तविक, २ ऑडिओ लीक झाले होते. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान, माजी मंत्री असद उमर आणि तत्कालीन प्रधान सचिव आझम खान एका बैठकीत अमेरिकन सायबरवर चर्चा करताना आणि ते स्वतःच्या हितासाठी वापरताना ऐकलं जाऊ शकते.
इम्रान खान यांनी अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री डोनाल्ड लू यांच्यावर अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत असद मजीद यांना धमकी दिल्याचा आरोप केलाय. त्यांचे सरकार पाडण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात लू मध्यवर्ती भूमिकेत होते, असंही सांगण्यात आलं.
एप्रिलमध्ये अविश्वास ठराव गमावल्यानंतर इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली होती. ज्यावर त्यांनी आरोप केला की रशिया, चीन आणि अफगाणिस्तानबाबत त्यांच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळं त्यांना लक्ष्य करण्यात आलंय. या कटात अमेरिकेने पुढाकार घेतला.
नाराजी व्यक्त करताना पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) नेत्या मरियम नवाझ शरीफ म्हणाल्या की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार इम्रान खान यांना अटक करण्यात अपयशी ठरलंय. इम्रान खान यांच्या बनी गाला येथील निवासस्थानावर छापे टाकण्याचं आवाहन मरियम नवाज यांनी सरकारला केलंय, जेणेकरून महत्त्वाचे पुरावे मिळू शकतील. मरियम म्हणाल्या की, इम्रान यांनी जे काही केलं त्यानंतर त्यांची अटक आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे