ठाण्यात कडक लाॅकडाऊनची घोषणा……

ठाणे ९ मार्च २०२१;संपूर्ण राज्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.हळूहळू राज्यातील विविध भागात लाॅकडाऊन करण्यात येत आहे.जिथे कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.तिथे पुन्हा कढक निर्बंधासह लाॅकडाऊन लावण्यात आले आहे.मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन जनतेशी संवाद साधला होता आणि नागरिकांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आहवान ही केले होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाणे प्रशासन ही सतर्क झाले आहे.ठाण्यात ही दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.त्याच पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटस्पाॅट क्षेत्रात कडक लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.ज्यामुळे ठाणेकरांना आता सावधान आणि सतर्कतेने राहणे गरजेचं आहे.

ठाणे शहरातील हाॅटस्पाॅटची संख्या हि १६ आहे.या १६ हाॅटस्पाॅट मध्ये ९ मार्च पासून ते ३१ मार्च पर्यंत लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत.महापालिकेचे आयुक्त डाॅ विपीन शर्मा यांनी तसा आदेश काढला आहे.ज्यामधे ठाण्यातील त्या भागांत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद राहील.

हि आहेत ती हाॅटस्पाॅट ठिकाणं…..

येथे लाॅकडाऊन आई नगर,कळवा,सूर्य नगर,विटावा,खारेगाव हेल्थ सेंटर,चेंदणी कोळीवाडा,श्रीनगर,हिरानंदानी इस्टेट,लोढा माजीवाडा,रूणवाल गार्डन सिटी,बालकूम,लोढा. अमारा,शिवाजी नगर,दोस्ती विहार,हिरानंदानी मिडोज,पाटील वाडी,रूणवाल प्लाझा,कोरेस नक्षत्र,कोरेस टाॅवर,रूणवाल नगर,कोलबाद,रूस्तोमजी,वृंदावन.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा