दुय्यम निबंधक कार्यालयात सोशल डिस्टन्सला हडताळ

बारामती, २४ डिसेंबर २०२०: बारामती शहरातील प्रशासन भवन येथे दुय्यम निबंधक कार्यालयाचे दोन कार्यालय आहेत. शासनाने डिसेंबर अखेर पर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने येथे दस्त नोंदवण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, सध्या सुरू असणाऱ्या कोरोना संसर्गाच्या धर्तीवर येथे सर्व नियम फाट्यावर मारल्याचे चित्र दिसत आहे.

येथे येणाऱ्या अनेक गावाहून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत असुन येथे कोणत्याही शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.
सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वत्र नियमांचे पालन केले जात आहे मात्र, शहरातील प्रशासन भवन येथील दुय्यम निबंधक कार्यालय याला अपवाद ठरत आहे.

येथे असणाऱ्या दोन कार्यालयात सकाळ पासून मोठी गर्दी असून त्या छोट्या कार्यालयात नागरिक कोणताही सोशल डिस्टन्स, सॅनिटायजर, मास्क वापरने पाळले जात नाही. शासनाने डिसेंबर अखेर स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने तसेच कुटुंबातील पूर्वी वाटप पत्राला जास्त खर्च येत होता मात्र तेच आता बक्षीसपत्र केल्यावर यासाठी अगदी अल्पदरात होत असल्याने दोन्ही कार्यालयात पूर्वी पेक्षा डबल रोज साधारण १८० दस्त नोंदणी होत आहे.

प्रत्येक कागदाला साधारण पाच पेक्षा जास्त लोक असल्याने येथे लहान कार्यालयात कोणताही फिजिकल डिस्टन्स पाळला जात नाही व मोठी गर्दी होत आहे. येथे सॅनिटायजर ठेवणे गरजेचे आहे मात्र त्याचा वापर होत नाही.तर ज्या व्यक्तीचे खरेदीखत आहे त्याच्या संबंधित लोकांनाच सोशल डिस्टन्स ठेऊन आत मध्ये सोडले पाहिजे तर बाहेरील लोकांना काही अंतरावर उभे करणे गरजेचे आहे.

कार्यालयात कोरोनाच्या धर्तीवर सूचना फलक लावला आहे. मात्र, याच्या अगदी उलटा कारभार चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथे असणाऱ्या प्रत्येक एजंटकडे दोन तीन दस्त नोंदणी साठी असतात हे सगळे लोक या ठिकाणी येऊन गर्दी करतात, तर दुय्यम निबंधक यांनी जो दस्तऐवज पूर्ण स्वरूपात आहे त्यांचा नंबर घ्यावा म्हणजे येथे गर्दी होणार नाही मात्र अनेक वेळा अपूर्ण असणारे दस्त येथे दुरुस्त करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्याने देखील गर्दी होते.

प्रत्येक दस्तऐवज नोंदणी करायला १५ ते २० मिनिटे वेळ लागतो. शासनाने दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सुट्ट्या कमी करून कार्यालयाची वेळ वाढवली आहे. तरी नागरीक कार्यालयात,व्हरांड्यात व परिसरात बसून रहातात. येथे कामासाठी येणारे नागरिक हे जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून येत आहेत. येथे त्यांचे टेम्परेचर व ऑक्सिजन तपासणी केली जात नाही. सध्या ग्रामपंचायतीचा फॉर्म भरण्याचा काळ असल्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी देखील मोठी गर्दी होते आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा