मणिपूरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 4.8 तीव्रता

मणिपूर, १७ जुलै २०२२: ईशान्येकडील राज्यात रात्री उशिरा धरती हादरल्याने खळबळ उडाली. मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.८ नोंदवण्यात आली आहे. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मणिपूरमधील मोइरांगच्या पूर्व आणि दक्षिण पूर्व भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली मध्यभागी ९४ किमी इतकी मोजण्यात आली आहे. तर भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानीपासून ६६ किमी अंतरावर होता.

शनिवारी रात्री मोइरांगमध्ये सर्व काही सामान्य होते. मग अचानक जमीन हदरू लागली. जेव्हा लोकांना जमिनीची कंपने जाणवली तेव्हा ते घराबाहेर पडले. रात्री अकराच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

यापूर्वी ५ जुलै रोजी आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ मोजली गेली. त्याची खोली ३५ किमी होती. तर नुकतेच अरुणाचल प्रदेशातील कमले येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.७ इतकी मोजली गेली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा