दिल्लीत शनिवारी रात्री तीव्र भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

3

नवी दिल्ली, ६ ऑगस्ट २०२३ : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता तब्बल ५.५ रिश्टर स्केल होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. काल रात्री ९ वाजून ३४ मिनिटांच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान येथील हिंदूकूश पर्वत येथे भूकंपाचे केंद्र होते. सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची किंवा इतर नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपाची तीव्रता जास्त होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अफगाणिस्तानच्या हिंदूकूश येथे भूकंपाचे केंद्र असल्यामुळे भारतासह पाकिस्तानतही धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे भूकंपाची घटना ही पहिली नाही. याआधी देखील दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा