काठमांडू, ३१ जुलै २०२२: नेपाळची राजधानी काठमांडूला रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ एवढी होती. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचा प्रभाव दिसून आला आहे. सकाळी ७.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
रविवारी सकाळी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सर्व काही सामान्य होते. सुट्टीचा दिवस असल्याने लोक आपापल्या घरी होते. पण जमीन हादरल्याने खळबळ उडाली. लोक घराबाहेर पडले. वास्तविक भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी होती.
उत्तर बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळला लागून असलेल्या मधुबनी, समस्तीपूर, अररिया, कटिहार, सीतामढी येथे सकाळी ७.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, राजधानीच्या पूर्व-दक्षिण-पूर्वेस १४७ किमी अंतरावर केंद्र होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे