राजधानी दिल्लीत जोरदार भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली, २४ जानेवारी २०२३ :देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागात मंगळवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. अचानक भूकंपाचे धक्के बसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेकांना घाबरुन घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडावे लागले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नेपाळ हे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी मोजली गेली आहे. नेपाळमधील कालिका येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर आत होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा