सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविकांची जोरदार निदर्शने

सोलापूर, दि. ८ ऑगस्ट २०२०: देशभरातील योजना कर्मचारी हे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून कोरोना संघर्षात आघाडीवर आहेत. कोरोना महामारीमध्ये अंगणवाडी कर्मचारी हे प्रकल्पाची सर्व कामे करत आहे, तरी देखील त्यांचा मागण्यांकडे कानाडोळा केला जात आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा व विविध स्वरूपाचे आंदोलने सुरू आहे. दि .७,८, आणि ९ ऑगस्ट २०२० रोजी केंद्रीय कामगार संघटनांनी योजना कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनसह विविध प्रश्नांवर आंदोलन जाहिर केलेले होते.  त्यात आज दि.८ ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये माढा व मंगळवेढा या तालुक्यातील अनेक बिटमध्ये सोलापुर जिल्हा अंगणवाडी महिला कर्मचारी युनियन कडून अतिशय जोरदार निदर्शने करण्यात आली.

पोस्टर दाखवून, थाळ्या वाजवून निषेध व्यक्त केला आणि आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी ,सोलापूर यांना युनिट मधील निर्मला स्वामी, संगीता आगलावे, सिद्धार्थ प्रभुणे, छाया तिप्पट, वर्षा वेदपाठक, पंडित मॅडम यांच्याकडून निवेदन देण्यात आले.

निवेदनात खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या: 

१)  राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तातडीने मानधना ऐवजी वर्ग ३ व वर्ग  ४ ची वेतनश्रेणी लागू करा         व दरमहा पेन्शन लागू करावी.
२) अंगणवाडी कर्मचारी यांना अत्यंत जुजवी प्रशिक्षण देऊन घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यास सांगितला जात आहे यात               सेविकांना अनेक लोकांचा संपर्कात जावे लागते आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात येऊन अंगणवाडी सेविकांना             कोरोना होण्याची शक्यता वाढते व त्यांचा प्रसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना होण्याची शक्यता असते त्यामुळे कोरोना           संबंधित कामे  अंगणवाडी सेविकांना देऊ नका.
३) सरकारी सेवा आणि सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण इ. धोरणे मागे घेण्यात यावी.
४) सर्व खाजगी – सरकारी उद्योग संस्थामधील कंत्राटी व मानधनी प्रथा रद्द करून तेथे काम करणाऱ्या हॉस्पिटल                    कर्मचारी,अंगणवाडी, आशा कर्मचारी, सफाई कर्मचारी मानधनी अल्पवेतनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा व            तोपर्यंत समान कामाला समान वेतनाची अंमलबाजवणी करा.

या मागण्यांसाठी आज निर्दशने करण्यात आली. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका इतर कर्मचारी युनियन सदस्य उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा