स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम

नवी दिल्ली, १५ फेब्रुवरी २०२१: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला १३४ धावांवर ऑल आऊट करत १९५ धावांची बढत घेतली आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर. अश्विन याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या तर ,ईशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांना २ विकेट्स भेटल्या. तसेच मोहम्मद सिराज याला एक विकेट मिळाला.

इंग्लंड संघासाठी अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्टुअर्ट ब्रॉड याला आर.अश्विन याने अवघ्या २ चेंडूत बाद केले. बाद होताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज बनला. स्टुअर्ट ब्रॉड ३६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

तसेच वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श हा या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. तो एकूण ४३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. तसेच या यादीमध्ये क्रिस मार्टिन,ग्लेन मग्रथ, शेन वॉर्न यांचा देखील समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा