फार्मसी काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

10

उंडवडी कडेपठार: वार्ताहार:डेलोनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग व प्लेस्मेंट विभागामार्फत आज गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सिंगापूर मधील नामांकित कंपनी क्लिनिकल ट्रायल मॅनेजमेंटचे डायरेक्ट डॉक्टर प्रमोद काशीद यांना आमंत्रित करण्यात आले होते.

त्यानी विद्यार्थ्यांशी “ड्रग डेव्हलपमेंट सायकल आणि त्यामधील करिअर च्या संधी” या बद्दल संवाद साधला. यानिमित्ताने मार्गदर्शन करत असताना डॉ काशीद यानी क्लिनिकल रिसर्च मधील करिअरच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध आहेत हे देखील सांगितले व या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासूनच प्रयत्नशील असावे हा कानमंत्र दिला.

महाविध्यालयास दिलेल्या भेटी दरम्यान त्यानी या ठिकाणी उपलब्ध असनारा अनुभवी स्टाफ व विध्यार्थीना देण्यात येणाऱ्या इतर सोइ सुविधांचे तोंड भरून कौतुक केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील यांनी डॉ.काशीद यांचे स्वागत केले तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापक श्रीकृष्ण बावकर यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. प्राध्यापक अतुल भुजबळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्राध्यापक दत्तात्रय कातोरे यांनी आभार व्यक्त केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा