जळगाव, १२ जून २०२३: शाळेत प्रार्थना सुरू असताना चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ येथे उघडकीस आली आहे. भुसावळ शहरातील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात हा विद्यार्थी शिकत होता. सुयोग भूषण बडगुजर वय वर्षे १३ असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
सोमवार हा शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास वर्गात प्रार्थना सुरू झाली. यावेळी आठवीमधील विद्यार्थी सुयोग बडगुजर याला चक्कर येऊन तो खाली पडला. यावेळी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सुयोगच्या वडीलांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आजी, आई आणि बहिण असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणी कोणत्याही पक्षपातांनी सखोल चौकशी करु, असे आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर