जीवन डुबे याचे गायन स्पर्धेत यश

पाटेठाण, २९ ऑगस्ट २०२०: टेळेवाडी (ता.दौंड) येथील जीवन ज्ञानदेव डूबे याने पुणे येथील टीम केअर फॉर यू संस्थेच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जीवन डुबे हा गलांडवाडी (दौंड) येथील श्रीसंतराज योगी शिक्षण संस्था संचलित कै.अनाजी खाडे निराधार मुलांचे बालकाश्रमात राहणारा विद्यार्थी असून जीवन गेली चार वर्षे गायन वादनाचे धडे गिरवत आहे.यापूर्वी देखील जीवनने गाण्याच्या अनेक स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस पटकावले आहे. या गाण्याच्या स्पर्धेत राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

संस्थेचे संस्थापक खंडेराव खाडे, अध्यक्षा प्रमिला खाडे यांच्या संकल्पनेतून गेली वीस वर्षे संस्थेमध्ये संगीताचे शिकवणी वर्ग चालू आहेत. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील निराधार व अनाथ बालगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये एकुण एकवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेत जीवन डुबे याचा प्रथम क्रमांक आला. संगीत शिक्षक सुुुभाष फासगे, तानाजी गोफणे यांचे मार्गदर्शन लाभले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा