युक्रांदच्या लढ्याला यश…!

पुणे, २६ डिसेंबर २०२०: सर्व आंदोलक विद्यार्थ्यांच्या एकतेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या आज मान्य केल्या. तसेच आज काही विद्यार्थ्यांचे निकालही देण्यात आले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गठीत केलेल्या समितीने आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार सोमवारी म्हणजेच २८ डिसेंबरला सर्व आंदोलक विद्यार्थ्यांचे सुधारीत निकाल मिळणार आहेत, असे ही सांगण्यात आले.

कुलगुरूंच्या निष्काळजीपणा मुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची दखल विद्यापीठाने घेण्यासाठी व मागण्या मान्य करण्यासाठी युक्रांदच्या नेतृत्वाखाली कडाक्याच्या थंडीमध्ये चार दिवस आंदोलन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारतीसमोर युवक क्रांती दलाने २३ डिसेंबरला सुरू केलेले सत्याग्रही आंदोलन सलग तीन दिवस कडाक्याच्या थंडीत चालूच होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी विद्यापीठ प्रशासनाकडून अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात आलेल्या त्रुटींबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे.

आंदोलन सक्रीय करण्यामध्ये युक्रांदचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे, युक्रांदचे पदाधिकारी संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, नीलम पंडित, कमलाकर शेटे आणि विद्यार्थी आंदोलक सहभागी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा