पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी

बालासोर: या क्षेपणास्त्राची नेहमीच सातत्याने चाचणी घेण्यात येत असते. चाचण्यांमध्ये आलेल्या निष्कर्षांवरून या क्षेपणास्त्र मध्ये हवे ते बदल केले जातात.
याच सिरीज मधील पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून लष्करासाठी दोन क्षेपणास्त्रांची चाचणी झाली. पृथ्वी-२ चा पल्ला ३५० किलोमीटर आहे. ही चाचणी नेहमीच होते आणि ठरलेले निष्कर्ष या क्षेपणास्त्राने पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली.
अशाप्रकारचे क्षेपणास्त्र बनवणारे मोजकेच देश आहेत त्यातील भारत एक आहे. संरक्षणामध्ये भारत पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहायला हवा असे सध्याचे सरकारचे मनाने आहे. त्या दृष्टिकोनातून भविष्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. तथापि पृथ्वी क्षेपणास्त्र हे आत्ताचे तंत्रज्ञान नाही तर ते याआधीच विकसित करण्यात आले होते. वेळेनुसार तंत्रज्ञानामध्ये बदल करण्यासाठी अशा प्रकारची चाचणी सातत्याने घेतली जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा