

लंडन १७ जुलै २०२० : कोविड-१९ च्या लसीच्या प्राथमिक टप्प्यात मानवी चाचण्यांनंतर प्राणघातक कोरोनाव्हायरसपासून “दुहेरी संरक्षण” मिळण्याची शक्यता आहे. तसे परिणाम चाचण्यांतून दिसून आले आहेत.हे निष्कर्ष सोमवारी जाहीर केले जातील,असा अंदाज आहे.यूकेच्या स्वयंसेवकांच्या गटाकडून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमधून ही लस शरीरात अँटीबॉडीज आणि “किलर टी-सेल्स” तयार करण्यास मदत करते.
भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं फार महत्त्वाचं…
या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने कोट्यवधींची गुंतवणूक केलीय. सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे या लसीचे कोट्यवधी डोस तयार आहेत. त्यांनीही या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी घेतलीय.ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे.ते यशस्वी झाल्यास कोरोनावर खऱ्या अर्थाने उत्तर सापडलेलं असेल.
भारतातची लस लवकरच उपलब्ध येण्याची शक्यता…
हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या औषध कंपनीने आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च संस्था तसंच पुण्यातील एनआयव्ही म्हणजे राष्ट्रीय विषाणु विज्ञान संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस बनवली आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या परवानगी देताना आयसीएमआरने १५ ऑगस्टपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याचं आवाहन भारत बायोटेक कंपनीला केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी