अग्नि प्राईम ची यशस्वी चाचणी, २००० कि.मी. ची रेंज, न्यूक्लिअर वाॅर हेड वाहून नेण्याची क्षमता

नवी दिल्ली, २९ जून २०२१: सोमवारी भारतानं उन्नत अग्नि मालिकेच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अग्नि प्राइम नावाच्या या क्षेपणास्त्राची श्रेणी २००० किमी आहे. हे क्षेपणास्त्र न्यूक्लियर हेड वाहून नेण्यासही सक्षम आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं (डीआरडीओ) सकाळी १०.५५ वाजता ओडिशा किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर डीआरडीओ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चाचणी दरम्यान अग्नि प्राइम सर्व बाबींवर अचूक असल्याचं आढळलंय. या क्षेपणास्त्राच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं निरीक्षण ट्रॅकिंग रडार व टेलिमेट्रीद्वारे केलं गेलं. सर्व स्केलवर अण्वस्त्रे ठेवण्यास सक्षम क्षेपणास्त्राची कामगिरी उत्कृष्ट होती.

लाँचरवरून डागता येणार मिसाईल

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अग्नि प्राइमची रचना ४००० किलोमीटरची रेंज असलेल्या अग्नि -४ आणि पाच हजार किलोमीटर रेंज असलेल्या अग्नी-५ च्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. ह्यामुळंच या नवीन मिसाईल ची टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स लेवल चे आहे. नवीन क्षेपणास्त्र वजनानौ हलकं आहे आणि मोबाईल लाँचरवरूनही ते डागलं जाऊ शकतं.

लवकरच सैन्यात दाखल होण्याची अपेक्षा

अग्नि प्राइम क्षेपणास्त्र टू स्टेज प्रोपल्शन सिस्टमद्वारे उडान भरते आणि सॉलिड फ्युल वर आधारित आहे. या मिसाइल ची गायडींग सिस्टम इलेक्ट्रोमेकॅनिकल अ‍ॅक्ट्युएटर्ससह सुसज्ज आहे. अग्नि प्राईम केवळ २००० किमीच्या अंतरावर शत्रूच्या युद्धनौकाांना लक्ष्य करण्यात सक्षम नाही तर न्यूक्लिअर वाॅर हेड वाहून नेण्यास सक्षम असल्यामुळं त्याची घातकता आणखीन वाढते. लवकरच हे नवीन क्षेपणास्त्र सैन्य दलात सामील होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा