अहमदनगर, २३ सप्टेंबर २०२०: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं (डीआरडीओ) लेझर गाईडेड अँटी टँक मिसाईलची यशस्वी चाचणी केली. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील एमबीटी अर्जुन टँकवरून ही फायरिंग करण्यात आलीय. या चाचणी दरम्यान अँटी-टँक क्षेपणास्त्रानं तीन किलोमीटर अंतरावरील लक्ष्य यशस्वीपणे नष्ट केलं.
या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. राजनाथ सिंह यांनी ट्विट केलं की, “अहमदनगरमधील केके रेंज (एसीसी अँड एस) येथे एमबीटी अर्जुन टँक मधून लेझर गाईडेड अँटी टँक मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.” डीआरडीओचा भारताला अभिमान आहे. कारण भारतात बाहेरून जी युद्धसामग्री विकत घेतली जात आहे ती देशामध्येच बनवण्याचं काम डीआरडीओ करत आहे.’
डीआरडीओच्या मते हे अनेक-प्लेटफ़ॉर्म लॉन्च क्षमतेसह विकसित केले गेले आहे आणि सध्या एमबीटी अर्जुनमध्ये बसवलेल्या गन मधून फायरिंग करून तांत्रिकदृष्ट्या त्याचं मूल्यांकन केलं जात आहे.
लढाऊ ड्रोनची यशस्वी चाचणी
यापूर्वी मंगळवारी डीआरडीओनं ओडिशाच्या बालासोरमध्ये लढाऊ ड्रोनची यशस्वी चाचणी केली. हा एक हाई-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) ड्रोन आहे, जो एडीई मध्ये विकसित केला आहे. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, हे शस्त्रास्त्र प्रणालींना चाचणीसाठी वास्तववादी धोका असल्याचा भास करुन देते, ज्याच्या मदतीनं विविध क्षेपणास्त्रे किंवा हवाई वाहतुक शस्त्रे तपासली जाऊ शकतात. सराव फाइटर ड्रोन ऑटोपायलटच्या मदतीनं स्वायत्त उड्डाणांसाठी डिझाइन केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे