चेन्नई, १८ ऑक्टोबर २०२०: रविवारी ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार नौदलाचे स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस हे येथून अरब सागरात लक्ष्य केले गेले. क्षेपणास्त्राने अचूकतेने यशस्वीपणे लक्ष्य गाठले.
चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावात भारत आपली शक्ती बळकट करण्यात गुंतला आहे. याबाबतीत रविवारी देशाला मोठे यश मिळाले आहे. ब्रह्मोस प्राइम स्ट्राइक हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याच्या सामुद्रिक पृष्ठभागाच्या लक्ष्यावर देखील अचूकपणे निशाणा साधू शकते ज्यामुळे युद्धनौकांची कार्यक्षमता आणखीन वाढते.
यापूर्वी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ओडिशाच्या चांदीपुर येथे ३० सप्टेंबर रोजी ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी केली. ब्रह्मोस हे पहिले सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे सध्या सेवेत आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाने २००५ मध्ये आयएनएस राजपूतवर तैनात केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे