गोल पोस्ट महाराष्ट्र या अभिनेत्रीच्या ट्रोलिंगला कंटाळुन अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी उचललं मोठ पाऊल..

या अभिनेत्रीच्या ट्रोलिंगला कंटाळुन अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी उचललं मोठ पाऊल..

Sudesh Mhashilkar sends inappropriate messages: अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी प्राची पिसाट या अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाऊंट ला काही अश्लील मेसेज केले. “तुझा नंबर पाठव.. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय” आणि प्राचीने सुदेश यांच्या चॅटचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्राचीची बाजू घेत सुदेश यांच्यावर टीका केली. अशातच ट्रोलिंगला कंटाळून सुदेश म्हशिलकर यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय

अभिनेते सुदेश म्हशीलकर यांना प्राची पिसाट प्रकरणामुळे प्रचंड ट्रोलिंगला सामोर जावं लागलं अनेक लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओवर वाईट कमेंट केल्या आणि ह्यामुळे सुदेश म्हशीलकर ह्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्व पोस्ट आणि त्याचे रिल व्हिडिओ डिलिट केले आहेत. अगदी काल परवापर्यंत त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या पोस्ट आणि रिल्स दिसत दिसत होत्या परंतु आता त्यांनी सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचं फेसबुक अकाऊंट सुद्धा प्रायव्हेट केलं आहे.

सुदेश म्हशिलकर यांचं अकाउंट हॅक झाल्याने त्यांच्याकडून प्राची पिसाटला असे मेसेज गेले का, अशीची चर्चा सुरु होती. याविषयी प्राचीने खुलासा केला की, “मी माझ्या बाजूने सायबर क्राइम अधिकाऱ्यांना विनंती करुन आधीच चेक आणि कन्फर्म केलं आहे की, त्यांचं अकाउंट खरंच हॅक झालं आहे की नाही? त्यावेळी सायबर क्राइम टीमने सांगितलं की, एप्रिल पासून त्यांचं अकाउंट हॅक झालं नव्हतं.” तीन दिवस उलटून गेले तरीही सुदेश यांनी या प्रकरणावर त्यांची बाजू मांडली नाही. अशातच आता सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डीलिट केल्याने या संपूर्ण प्रकरणात सुदेश काय भूमिका घेणार, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी,इंदिरा तेंडोलकर

error: Content is protected !!
Exit mobile version