केंद्रीय आरोग्य खात्याच्या सचिवपदी सुधांश पंत यांची नियुक्ती

नवी दिल्ली १४ जून २०२३: केंद्र सरकारने अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून आरोग्य खात्याच्या सचिवपदी सुधांश पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंत हे १९९१ च्या राजस्थान केडरचे आय ए एस अधिकारी आहेत. नवी नियुक्ती होण्यापूर्वी ते शिपिंग आणि बंदर खात्यांचे सचिव होते.

येत्या ३१ जुलै रोजी विद्यमान आरोग्य सचिव राजेश भूषण हे सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांची जागा पंत घेतील. यासोबतच हवाई वाहतूक खात्याचे सचिव म्हणून चंचल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत. १ ऑगस्ट रोजी ते नव्या पदाचा कार्यभार हाती घेतील.

सरकारने ऊर्जा खात्याच्या सचिवपदी पंकज अगरवाल यांची नेमणूक केली आहे. याशिवाय रजत मिश्रा यांची खते आणि रसायन खात्याच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. अगरवाल हे मध्यप्रदेश केडरचे तर मिश्रा हे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा