इंदापूर, दि.१६ मे २०२०: साखर क्षेत्रातील काही निवडक मान्यवरांसह एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड, इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अंकिता पाटील यांच्यासोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील कॉन्फरन्ससाठी उपस्थितीत होते. नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज् लिमिटेडच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांनी तर इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी उपस्थिती लावली.
यावेळी सर्व प्रतिनिधींनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार व सुचना मांडल्या. यावेळी अंकिता पाटील यांनी साखरेचा हमीभाव कमीत कमी ३५ रुपये करावा आणि सद्यस्थितीला कोरोनामुळे निर्यातीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सर्व कारखानदारांकडे साखरेचा खूप मोठा साठा उपलब्ध आहे. एकीकडे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल. यासाठी साखर कारखानदार प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे त्या साखरेची विक्री होत नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहे.
या दोन्हीतून जर मार्ग काढायचा असेल तर साखर कारखानदारांनी इथेनॉलची निर्मिती करावी त्याशिवाय दुसरा पर्याय नाही,असे मत अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.
इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवत प्रोत्साहीत करत आहे आणि विविध सबसीडी देत आहे. साखर उद्योगाला यापूर्वीच केंद्र सरकारकडून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यातूनही साखरेचा उठाव ठप्प असल्याने शेतकऱ्यांची बिले थकित राहण्याचे प्रमाण यंदाच्या हंगामात जास्त आहे.
यावर उपाय म्हणून येणाऱ्या हंगामात कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे, अशी सुचना यावेळी अंकिता पाटील यांनी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे