‘वीजबिला’ मुळे आत्महत्या

नागपुर,१० ऑगस्ट २०२० : राज्यात सध्या वीज बिलावरुन चांगलाच भडका उडाल्याचे चित्र आहे. तर वाढत्या वीज बिलावरुन विरोधी पक्ष आणि सरकार मधे जुंपली आहे. एकिकडे विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहे. तर आघाडी सरकार स्वत:चा बचावासाठी प्रयत्न करत आहे यांच्या या राजकिय वादात मात्र नाहक त्रास हा सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय ज्याचे गंभीर परिणाम समोर येत आहे. वीज बिल पाहूनच एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुखद घटना समोर आली आहे.

लाॅकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा बिल आल्याने ५७ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. लीलाधर लक्ष्मण गैधाने असे मृत व्यक्तीचे नाव असून नागपुरातील यशोधरा नगर मधे हि व्यक्ती तळमजल्यावर राहत होती. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात त्यांच्याकडे गेल्या आठवड्यात ४० हजार रुपये वीज बिल आले होते.एवढे पैसे भरायचे कसे याचे टेंशन त्यांना आले. आणि त्या टेंशन मधेच त्यांनी स्वत:वर राॅकेल ओतून आग लावत आत्महत्या केली.

राज्यातील अत्यंत दुर्दैवी अशी हि धक्कादायक घटना घडली आहे. तर राज्यातील जनता हि अजूनही वीजबिलाच्या धक्क्यातून सावरले नसल्याचे चित्र सध्या आहे. तर काही नागरिक हे जाऊन वीज बिल भरत आहेत तर काही नागरिक सरकारच्या याविषयावर काही तरी दिलासादायक घोषणा होईल या प्रतिक्षेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा