केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या

पुणे १७ जुलै २०२२ : अभिनेत्री केतकी माटेगावकरचा भाऊ अमोल माटेगावकर यांने पुण्यात हिंजवडी येथे आत्महत्या केली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन त्याने उडी मारुन जीव दिला.

अमोल हा कम्प्युटर सायन्स येथे चौथ्या वर्षांला शिकत होता. तो सध्या नोकरीच्या शोधात होता. मात्र मनासारखी नोकरी आणि प्लेसमेंट मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितले.

अमोलने आत्महत्येपूर्वी सुसाईड नेटकी लिहून ठेवली होती. ज्यात त्याने I QUIT असा शेवट केला आहे. तर आई , बाबा आणि बहिणीला सॅारी म्हणत आयुष्याचा शेवट करत असल्याचं सांगितलं आहे.

केवळ २१ व्या वर्षी त्याने जीवन संपवल्याने माटेगांवकर कुटूंबावर शोककळा पसरली आहे. अमोलचे बाबा हे नामांकित आयटी कंपनीत असून आई प्राध्यापिका आहे.

पुण्यातील हिंजवडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. यात आणखी धागेदोरे सापडतात का? यावर पोलिस लक्ष देऊन आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा